Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनचित्रपट-वेबसिरीज ‘या’ ॲप्सवर फ्री पाहता येणार, रिचार्जपासून सुटका होणार..

चित्रपट-वेबसिरीज ‘या’ ॲप्सवर फ्री पाहता येणार, रिचार्जपासून सुटका होणार..

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपट, वेबसिरीज, शो व इतर भरपूर काही आपल्याला स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टीव्हीवरदेखील बघता येते. Disney+ Hotstar, Amazon Prime Video, Voot, Netflix, ZEE5 आणि Jio Cinema सारखे असंख्य प्लॅटफॉर्म्स रिचार्ज करून युजर्स वापरत असतात.

सध्या लोक अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी मूळ रिचार्ज प्लॅनशिवाय लागणारे ओटीटीसाठीचे प्लॅन्स देखील घेतात. आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्यामुळे रिचार्जच्या किंमतीही जास्त वाटत असतील तर तुम्हाला दोन ॲपवर फ्री मध्ये हे सर्व पाहता येईल. ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन चित्रपट पाहता येऊ शकतात.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले फ्री अ‍ॅप ज्याचं नाव Sugarbox आहे, हे वापरू शकतात. तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून Sugarbox ला डाउनलोड करू शकता. तुम्ही या अ‍ॅपवर हाय-क्वालिटी चित्रपट आणि वेबसीरिज डाउनलोड करूनसुद्धा ऑफलाईन पाहू शकता.

Sugarbox हे एक हायपरलोकल एड्ज क्लाउड टेक्नोलॉजी सॉल्यूशन अ‍ॅप्लिकेशन आहे. महत्वाचं म्हणजे हे अ‍ॅप्लिकेशन जेथे वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क नसेल अशा ठिकाणीही SugarBox अ‍ॅप काम करेल. याशिवाय तुम्ही Pikashow नावाचं अ‍ॅप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता आणि मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -