Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनएक्स-गर्लफ्रेंडला पाहताच सलमानला आठवलं जुनं प्रेम; किस करत मारली मिठी

एक्स-गर्लफ्रेंडला पाहताच सलमानला आठवलं जुनं प्रेम; किस करत मारली मिठी

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय. या वाढदिवसाच्या पार्टीत जेव्हा संगीता बिजलानी पोहोचली, तेव्हा सलमानला त्याचं जुनं प्रेम आठवलं. संगीताला पाहताच सलमानने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठी मारली.

सलमान खान आणि संगीता बिजलानी हे एकेकाळी एकमेकांना डेट करायचे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगल्याच रंगायच्या. जवळपास 10 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

सलमानच्या बर्थडे पार्टीत संगीताने आवर्जून हजेरी लावली होती. ब्लू शिमर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.संगीता तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त सौंदर्यामुळे आणि सलमानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. सलमानसोबतच्या नात्यामुळे तिची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा व्हायची.

1986 मध्ये सलमान आणि संगीता एकमेकांना डेट करू लागले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा छापली गेली होती. मात्र संगीताने सलमानसोबतचं नातं तोडलं.त्यावेळी सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. हे जेव्हा संगीताला समजलं, तेव्हा तिने सलमानसोबतचं नातं तोडलं.

संगीताने नंतर 1996 मध्ये क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर 2010 मध्ये संगीताने घटस्फोट घेतला.सलमान आणि संगीता यांच्यात आजही खूप चांगली मैत्री आहे. सलमानच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही अनेकदा संगीताला पाहिलं जातं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -