Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जमिनीसाठी पुतण्याने चुलत्यावर केला चाकूने वार

कोल्हापूर : जमिनीसाठी पुतण्याने चुलत्यावर केला चाकूने वार

हातकणंगले तालुक्यातील टोप येथे जमिनीच्या वादासाठी पुतण्याने चुलत्यावर चाकूने वार केला. मानेवर चाकू लागल्याने विष्णुपंत गणपती पाटील वय ६२, रा. कासारवाडी रोड, पाटील टेक, टोप, ता. हातकणंगले हे जखमी झाले. याबाबत तानाजी विष्णुपंत पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून सचिन पांडुरंग पाटील, सागर पांडुरंग पाटील व आनंदी आनंदा पाटील सर्व रा. कासारवाडी रोड, पाटील टेक, टोप, ता. हातकणंगले यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी साडेसहाच्या सुमारास टोप येथील पाटील टेक येथे घडली.याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन व सागर पाटील हे विष्णुपंत पाटील यांचे पुतणे आहेत. पण त्यांच्यात गट क्रमांक ९४४ मधील २७ गुंठे जमिनीचा वाद सुरू आहे. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही मंगळवारी साडेसहाच्या सुमारास विष्णुपंत यांचा मुलगा तानाजी पाटील हे जनावरांचे दुध काढण्यासाठी जात असताना सचिन पाटील याने रस्ता आडवून तू विहीरीजवळच्या शेतात भांगलन का केलीस याचा जाब विचारला व शिवीगाळ केली. त्यांचा आवाज ऐकून तानाजी यांचे वडील विष्णुपंत बाहेर आले. त्यावेळी सचिनने तानाजी यांच्यावर चाकू उगारला होता. नेमके त्याचवेळी विष्णुपंत आडवे आले. त्यामुळे चाकूचा वार त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मानेवर झाला. यामध्ये विष्णुपंत जखमी झाले. तरीही सचिन, सागर व आनंदी पाटील हे शिवीगाळ करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -