Saturday, February 21, 2026
Homeकोल्हापूरदोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा विष पिऊन मृत्यू

दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा विष पिऊन मृत्यू

दिगवडे (ता.पन्हाळा) येथील दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाने वाघजाई डोंगरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अरुण दिलीप पाटील (वय २९ ,दिगवडे ता.पन्हाळा) असे तरुणाचे नाव आहे. अरुण पाटील हा मंगळवार (ता.७) रोजी घरी कोणाला काहीच न सांगता रागाने मोटरसायकलवरुन( क्रमांक म.एच.०९ ई एन ७००८ ) निघून गेला होता.

नातेवाईक,अरुणचे कुटुंबीय अरुणचा शोध घेत होते.पण तो मीळून न आल्याने पन्हाळा पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. अरुणचे नातेवाईक, मित्र, पोलीस त्याचा शोध घेत होते.आज गुरुवार (ता.०९) रोजी पुनाळ खिंडीपासून पुर्वेकडे गोपाळ सदाशिव पाटील यांच्या शेताच्या वरील बाजुला डोंगरात मृतदेह असल्याचे सव्वा बाराच्या सुमारास समजले.त्यानुसार वर्दीदार सागर बळवंत पाटील व त्याचा मित्र सतिश आरंडे (पुनाळ) यांना गाडीच्या नंबरवरुन शंका आल्याने शोध घेतला असता तो मृतदेह अरुणचाच असल्याची खात्री झाली.त्यानुसार सागर पाटील यांनी वर्दी दिली. घटनास्थळी कळे पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पन्हाळा आरोग्य केंद्रात पाठविला.त्याच्यावर शोकाकुल वातावरणात दिगवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या मागे आई,वडिल, पत्नी,तीन वर्षाचा मुलगा,असा परीवार आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एन.ए.चौगले तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -