Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : आई - वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

कोल्हापूर : आई – वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

‘काही काम धंदा करत नाहीस, नुसतं बसून खातोस ‘असं आई-वडील सतत टोचून बोलायचे,त्याच रागातुन त्यांना खुरप्यानं मारलं, अशी कबुली बहिरेवाडी खून प्रकरणातील संशयित आरोपी सचिन गोरूले यांने शुक्रवारी रात्री पोलीसांना घटनास्थळीच दिली. त्यामुळे पोलीसांनी त्याला अटक केली. आजरा येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला बुधवारपर्यंत पोली कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी बहिरेवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी कृष्णा बाबू गोरूले व त्यांच्या पत्नी पारूबाई यांच्यावर मुलगा सचिन ऊर्फ पप्पू यांने खुरप्याने जीवघेणा हल्ला केला. त्यात कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. पारुबाई या अत्यवस्थ असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या पश्चात आरोपी सचिन, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून घरातील माळ्यावर झोपला होता. पोलीसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली होती. शनिवारी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.
मृत कृष्णा यांचा चुलत नातू ऋतिक घुणके (रा. कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात सचिनविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -