कोडोली ता. पन्हाळा येथील एमएसइबी चौकात राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन संघटनेच्या वतीने कोडोली येथील महावीतरण वीज कपंनीला देणेत आले.
शेतीला दिवसा वीज मिळावी, अन्यायी वीज तोडणी त्वरित थांबवावी, शेतीमाला किमान हमीभाव मिळावा, प्रोत्साहनपर अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खातेवर जमा करा, भूसंपादनाचा मोबदला पूर्वी प्रमाणे मिळावा,पीक विमाची रक्कम त्वरित खातेवर जमा करावी, केंद्र आणि राज्य शासनाने रासायनिक खताचे दर कमी करावेत, या आणि अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार-बोरपाडळे रोडवरील कोडोली येथील एम एस इ बी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन कोडोलीतील महावीतरण वीज कपंनी, आणि कोडोली पोलिसांना देणेत आले.यावेळी स्वाभिमानीचे अजित पाटील, आनंदराव निकम,शिवाजी जाधव,सुमित पाटील,तानाजी पाटील विनोद देशमुख,प्रकाश बच्चे,किशोर पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.