भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेत.भाजप कार्यकर्त्यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचं स्वागत केलं. “आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा 158 कोटीचा दिसत होता. तो 500 कोटीहून अधिक असल्याचा सोमय्या यांनी केला आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफ यांनी बँकेलाही सोडलं नाही. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यालाही हसन मुश्रीफ यांनी अशा पद्धतीने लुटले की आता त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे यामुळे मी आज कोल्हापूर जिल्हा बँकेला भेट देणार आहे. चौकशी आणि पाठपुरावा करणार आहे”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -