Thursday, July 3, 2025
Homeकोल्हापूर"उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत": नारायण राणे

“उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत”: नारायण राणे

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला खरपूस शब्दांत प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केले, याचे आत्मपरीक्षण करावे. सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -