Airtel च्या ग्राहकांसाठी त्यांच्या खिशावर ताण वाढवणारी ही बातमी आहे. 2023 च्या मध्यावधीपर्यंत Airtel ची सेवा महागणार आहे, असे स्पष्ट संकेत भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन सुनील मित्तल यांनी दिले आहे.त्यामुळे एअरटेलची सेवा घेणा-या ग्राहकांना या वर्षीच्या मध्यावधीपर्यंत दरवाढीचा फटका बसणार आहे. एअरटेलची सर्व प्रकारची सेवा महागणार असून दरवाढ होऊ शकते. मात्र, असे असले तरी मित्तल यांनी सर्वसामान्यांवर याचा फारसा परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे.
सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने गेल्या महिन्यात 28 दिवसांच्या मोबाइल फोन सेवा योजनेसाठी त्याच्या किमान रिचार्जची किंमत आठ सर्कलमध्ये सुमारे 57 टक्क्यांनी वाढवून 155 रुपये केली आहे. कंपनीने 99 रुपयांचा त्यांचा किमान रिचार्ज प्लॅन बंद केला, ज्या अंतर्गत 200 MB डेटा आणि 2.5 पैसे प्रति सेकंद दराने कॉल ऑफर केले.
व्होडाफोन आयडियाची पुनरावृत्ती नको असेल तर…Airtel…
भारती एंटरप्रायझेसचे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटले आहे की भारताला ‘व्होडाफोन आयडिया प्रकारच्या परिस्थितीची’ पुनरावृत्ती नको असेल आणि टेलिकॉम उद्योगासाठी गुंतवलेल्या भांडवलावर परतावा वाढणे आवश्यक आहे. ज्यासाठी दरवाढ करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की या वर्षाच्या मध्यभागी दरवाढ होण्याची शक्यता आहे. परंतु या वाढीमुळे सर्वसामान्यांवर परिणाम होईल हे मत नाकारले. याशिवाय मित्तल म्हणाले की, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएममधील स्टेक विकत घेण्यासाठी भारती कधीही चर्चेत आली नव्हती.