Thursday, July 31, 2025
Homeयोजनानोकरीतलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; 'या' तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

तलाठी भरतीची बरेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याविषयीचे वेगवेगळे अपडेट्स सतत वाचायला मिळत असतात. या भरतीच्या माध्यमातून सुमारे साडे तीन ते साडे चार हजार पदे भरली जाणार आहेत. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात काही अद्याप प्रसिद्ध झाली नाही. ही जाहिरात जानेवारी अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं. पण अंतर्गत व शासकीय कामांमुळे जाहीरात येण्यास उशीर होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी इच्छुकांनी अभ्यासासाची तयारी करणे अपेक्षित आहे.

कोणत्या विभागात किती पदे

  1. नाशिक- 803 पदे
  2. औरंगाबाद – 799 पदे
  3. कोकण – 641 पदे
  4. नागपूर – 550 पदे
  5. अमरावती – 124 पदे 6. पुणे – 702 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  2. MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  3. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  1. 18 ते 35 वर्षे
  2. खेळाडूंना 5 वर्षे सूट
  3. प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त/अपंग यांच्यासाठी 7 वर्षे सूट असेल.

आवश्यक कागदपत्रे

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  3. 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  4. पदवी प्रमाणपत्र
  5. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
  6. इतर शैक्षणिक कागदपत्रे
  7. अधिवास प्रमाणपत्र
  8. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  9. जातीचा दाखला
  10. नॉन क्रिमिलियर
  11. जात वैधता प्रमाणपत्र
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -