मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवधनुष्य यात्रेला लवकरच महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. राज्यात लवकरच शिवसेना पक्षाची ‘शिवधनुष्य’ यात्रा सुरु होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेला ‘धनुष्यबाण’ या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात नेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाण्याची आखणी चालू आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तोच धनुष्यबाण यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळीकडे नेणार आहेत. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान , माझा धनुष्यबाण’ असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे.
ठाकरे गटाने राज्यभरात शिवसंवाद आणि शिवगर्जना अभियान केले होते, त्याला उत्तर म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लवकरच ‘शिवधनुष्य’ यात्रा महाराष्ट्रात सुरु होणार आहे.
शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा कशी होणार?
▪️ अयोध्येतून आणलेले शिवधनुष्य बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी नेऊन महाराष्ट्रभर यात्रा सुरु होईल.
▪️ ठाकरे गटाच्या आतापर्यंतच्या आरोपांना शिंदे गटाकडून उत्तर दिले जाईल.
▪️ यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा महसुली विभागात घेणार सहा सभा
▪️ मार्च अखेरीस नागपुरात मोठ्या सभेचे नियोजन असेल.
▪️ एकसंघ शिवसेना असताना ज्या ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर होता त्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले जाणार.