मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी आ. हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मला ‘ईडी’च्या कारवाईमध्ये अडकविण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह गडहिंग्लज व सेनापती कापशी शाखेवर ‘ईडी’ने छापा टाकल्यानंतर काही दिवसांतच मुश्रीफ यांच्यावर विवेक कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे शेअर्स देतो, असे सांगून मुश्रीफ यांनी आपल्यासह अन्य लोकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही फिर्याद सूडबुद्धीने दिली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही केला आहे.