अनुस्कुरा मलकापूर मार्गावर चौथा मैल येथे गॅस टँकर पलटी झाला.या अपघातात एक इसम ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.खबरदारी म्हणून शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष दक्षता घेतली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेजा पाटील,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपेयांनी भेट देऊन पाहणी केली.या मार्गावर होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलही दाखल झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुस्कुरा मलकापूर मार्गावर मलकापूरच्या दिशेने येत असलेला गॅसचा टँकर चौथा मैल पासून खाली उताराच्या दिशेला पलटी झाला आहे.हा अपघात रात्रीच्या दरम्यान घडला असल्याचीही माहिती समोर आली आहे.या अपघातात एक अज्ञात इसम ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून मलकापूर अनुष्का मार्गावर जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेजा पाटील,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांच्या सह पोलीस कर्मचारी, होम गार्ड यांनी सदर ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.