पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सारस्वत सहकारी बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 150 जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 08 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – सारस्वत सहकारी बँक
पद संख्या – 150 पदे
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने कोणत्याही शाखेमधून पदवीपर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे.
तसेच बँक/ NBFC/ विमा कंपन्या/ बँकेच्या कोणत्याही उप कंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सदर उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
वय मर्यादा – 1 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी – रु. 750/-
मिळणारे वेतन – रु. 2,44,343/- ते रु. 4,83,520 वार्षिक
असा करा अर्ज –
उमेदवारांनी प्रथम सारस्वत सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट saraswatbank.com वर जा.
होमपेज वरील घोषणा विभागात जा.
आता तुम्ही ‘कनिष्ठ अधिकारी रिक्त पदांची जाहिरात येथे क्लिक करा.
आता सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 च्या अधिसूचनेची PDF तुमच्या समोर उघडेल.
आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट देखील घेऊ शकता.
खाली दिलेल्या APPLY लिंकवरुन तुम्ही अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com