1 एप्रिलपासून केवळ कॅलेंडरचे पान पलटणार नाही, तर तुमच्या आयुष्यातही मोठा बदल होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाची, 2023-24 सुरुवात शनिवारपासून होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात काही ना काही बदल होतातच. अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा करण्यात आली होती. पण आता त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होत आहे. केंद्र सरकारने सोने आणि करासंबंधीचे काही बदल केले आहेत. सोन्याच्या विक्रीसंबंधी आता नवीन नियम लागू होतील. हॉलमार्कशिवाय सोने विक्री करता येणार नाही. नवीन कर व्यवस्था एप्रिलपासून लागू होईल. प्रधानमंत्री वय वंदना योजना बंद होणार आहे.
नवीन कर व्यवस्था लागू
नवीन कर व्यवस्था 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.
इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.
महिला सम्मान योजनेची सुरुवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक खास बचत योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, महिला सम्मान योजनेची सुरुवात करण्यात आली. महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत बचतीवर 7.5 टक्के व्याज मिळेल. महिला 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करु शकतील. त्यांना त्यावर 32 हजार रुपयांचा फायदा होईल.
प्रधानमंत्री वय वंदना योजना होणार बंद
उतारवयातील आर्थिक तरतूद म्हणून एक प्रमुख योजना प्रधानमंत्री वय वंदन योजना 1 एप्रिलपासून बंद होत आहे. एनपीएसमधील इतर योजनांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही प्रमुख योजना बंद करण्यात येत आहे. या योजनेत एकरक्कमी रक्कम जमा केल्यानंतर पेन्शनचा लाभ मिळेल.
कमी टीडीएस होईल कपात
तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील आणि तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आता कमी कर द्यावा लागेल. 1 एप्रिलपासून पीएफ खात्याशी पॅन कार्ड लिंक नसेल तर 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये पहिल्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येईल. आता या गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी जास्तीतजास्त 15 लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज देण्यात येते.
एलपीजीचे भाव
सरकारी गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे भाव जाहीर करतात. या किंमतीत बदल होतो. कंपन्या नवीन भाव जाहीर करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कंपन्यांनी झटका दिला होता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी घसरल्या होत्या. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 350 रुपयांनी वधारल्या होत्या. आता 1 एप्रिल रोजी कंपन्या महागाईचे गिफ्ट देतात कि दिलासा ते लवकरच कळेल.
हॉलमार्क अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.
जीवन विमा पॉलिसी
5 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा अधिक जीवन विमा हप्त्यातून होणारे उत्पन्न आता करपात्र असेल. नवीन आर्थिक वर्षात, म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजीपासून हे उत्पन्न करपात्र ठरेल. त्यावर गुंतवणूकदारांना कर द्यावा लागेल.
डेट फंडवर कर सवलत नाही
सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. जर कोणी डेट फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास, इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन कर लावल्या जातो. वास्ताविक, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार मिळते. प्रस्तावानुसार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत डेट फंडाच्या इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही 20% टॅक्स बेनिफिटसाठी पात्र नसाल.
कार महागणार
1 एप्रिल 2023 रोजीपासून कार तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या उत्पादनात बदल करणार आहे. BS-6 फेज-2 ची सुरुवात होत आहे. त्यामुळे कारच्या किंमती 20 ते 30 हजार रुपयांनी वाढणार आहेत. 1 एप्रिल पासून या कारमध्ये 0BD-2 हे यंत्र बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.
1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -