Sunday, July 6, 2025
Homeसांगलीटेम्पो-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, एक जण ठार

टेम्पो-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, एक जण ठार

तासगाव तालुक्यातील योगेवाडी हद्दीत गुहागर-विजापूर महामार्गावर टेम्पो अन् दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात कर्नाटक येथील रडारेड्डी (ता.अथणी) येथील संभाजी हाजीबा सावंत (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो उलटला. आज, शुक्रवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत संभाजी सावंत हे दुचाकीवरून (केए 23 ईजे 6795) तासगावच्या दिशेने नातेवाईकांकडे निघाले होते. तर वाळवा येथून द्राक्षभरून आंध्रप्रदेश मधील टेम्पो (एपी 39 युसी 0169) तासगावकडून कवठेमंकाळच्या दिशेने निघाला होता. गुहागर – विजापूर महामार्गावर मनेराजुरी आणि योगेवाडीच्या हद्दीत दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार सावंत जागीच ठार झाले. तर द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावरून पलटी झाला.

या घटनेनंतर मनेराजुरीचे पोलिस पाटील दीपक तेली आणि योगेवाडीचे पोलिस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -