▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिल्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
▪️कुस्तीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातदेखील हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या तालमींमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. गंगावेश तालमीमध्ये हनुमान जयंतीची तयारी पूर्ण झाली. कुस्तीच्या आखाड्यात शंकराची पिंड तयार करुन त्याची पूजा करण्यात आलीये.
▪️नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगली जवळच्या तुंगमधील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तुंगच्या मारुतीरायाचे मंदिर आहे. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी आज पहाटेपासून मोठी गर्दी केली.
▪️पुण्यात देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.पुण्यातील नवग्रह मारुती मंदिरात हनुमान जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून काल रात्रीपासूनच भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर आज सकाळपासून देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
▪️अकोलेकरांचं दैवत असलेल्या तपे हनुमान मंदिरात आज पहाटेपासूनच हनुमान भक्तांनी गर्दी केलीये. जवळपास पावणेपाचशे वर्षांचा इतिहास या मंदिराचा आहेय. या मंदिरात आज भक्तांसाठी प्रसाद म्हणून 501 किलोच्या सुक्यामेव्याचा लाडू बनवण्यात आला आहे. अकोला शहराबाहेर मरघट भागात मोर्णा नदीच्या काठावर हे मंदिर आहेय. वर्षभर येथे हनुमान भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.