राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपुर्ण जामीन मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे.
सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहारांच्या आरोपाखाली आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉंडरिंगचा आरोप ठेऊन ईडीकडे मुश्रीफांविरोधात तक्रार केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतरही मुश्रीफांनी चौकशीला जाणे टाळले होते. कोर्टात धाव घेऊन त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासाही दिला होता. पण आता कोर्टाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या अटकेपासून संरक्षण काढून घेतल्याने एक मोठा धक्का दिला आहे.