Thursday, August 7, 2025
Homeक्रीडाचेन्नई-राजस्थान आमनेसामने! कुणाचं पारड जड? 

चेन्नई-राजस्थान आमनेसामने! कुणाचं पारड जड? 

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये 12 मार्च रोजी लढत पाहायला मिळणार आहे. बुधवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात चेन्नईचा घरच्या मैदानावर हा दुसरा सामना आहे. चेपॉक स्टेडिअमवरील लखनौ विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा विजयी झाला होता. 

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ बुधवारी चेन्नईच्या घरच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचा पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला. तसेच तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केली. दुसरीकडे, राजस्थानने पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लखनौने तिसऱ्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला.

कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नईचं पारड जड आहे. चेन्नई संघाने 26 पैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर, राजस्थान संघाने 11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. त्यामुळे आजचा सामना रंजक ठरणार आहे.

चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम चेपॉक स्टेडियम म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो. 

कधी आणि कुठे होणार सामना?

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 12 एप्रिल रोजी बुधवारी रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -