Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; 'गोकुळ'ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचल्याने दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. ‘गोकुळ’चे गेल्या महिन्याभरात तब्बल एक लाख लिटरने दूध संकलन कमी झाले असून, वाढत्या उष्म्यामुळे दुभती जनावरे आटू लागली आहेत. इतर दूध संघांनाही तीव्र उन्हाळ्याचा फटका यावर्षी अधिक जाणवत आहे.

जिल्ह्यात यंदा फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे. प्रत्येक महिन्याला तापमानात वाढ होत असून, त्याचा जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उष्म्याने लहान मुले व वयोवृद्धांना अधिक त्रास होत आहे. जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यातून दूध उत्पादन घटू लागले असून, ‘ गोकुळ’चे मार्च महिन्याच्या तुलनेत १ लाख लिटरने दूध संकलन कमी झाले आहे. ‘वारणा’सह इतर खासगी दूध संघांनाही वाढलेल्या उष्म्याचा फटका बसला आहे.

जर्शी, होस्टन गायींना अधिक त्रास
उष्म्याचा त्रास सर्वच जनावरांना होत असला, तरी त्यातही जर्शी व होस्टन जातीच्या गायींना अधिक जाणवतो. या गायीचे दूध झपाट्याने कमी होताना
दिसत आहे.

उष्म्यापासून जनावरांचे असे संरक्षण करा :

  • जनावरांना दिवसातून किमान चारवेळा पाणी पाजा.
  • शक्यतो मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करावा
  • गोठ्यात दिवसभर गारवा राहील, असा प्रयत्न
    करावा.
  • जनावरांच्या अंगावर पोते भिजवून टाकावे
    · हिरवा चारा भरपूर द्यावा
  • तलाव्यात पोहण्यासाठी सोडावे
  • क्षार कमी होऊन थकवा येऊ म्हणून मिठाचे प्रमाण वाढवावे.

तारीख- म्हैस दूध -गाय दूध
एकूण संकलन
१८ जानेवारी – १० लाख १६ हजार ८५३ – ६ लाख ९२
हजार २५४ – १७ लाख ९ हजार १०७
१८ फेब्रुवारी – ८ लाख ७४ हजार ४७५ – ६ लाख ३३
हजार ५६२ – १५ लाख ८ हजार ३७
१८ मार्च – ७ लाख ८० हजार २३६ – ६ लाख ४३ हजार
८७० – १४ लाख २४ हजार १०६
१८ एप्रिल – ६ लाख ७६ हजार ५२९ – ६ लाख ४६
हजार ३६८ – १३ लाख २२ हजार ८९७

” गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उष्मा अधिक असल्याने जनावरांना त्रास होत आहे. जनावरे आजारी
पडण्याबरोबरच दुधाला कमी झाली आहेत. पशुपालकांनी जनावरांच्या गोठ्यात गारवा राहील, असे नियोजन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -