जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून याबाबत घोषणा केली आहे. शिंदे गटातील गद्दार असलेल्या कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलमधूनही बाहेर पडला आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून याबाबत घोषणा केली आहे. शिंदे गटातील गद्दार असलेल्या कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील गद्दार लोक असलेल्या आघाडीमध्ये सहभागी होणार नाही, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल, पण गद्दार शिंदे गट असलेल्या आघाडीसोबत कोणतीही निवडणूक लढवणार नाही. सत्ताधारी आघाडी विरोधात शिंदे गटासोबत समझोता होऊन तयार झालेले पॅनेल आम्हाला मान्य नसल्याचे संजय पवार म्हणाले.
शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधातील आणि शिंदे गटाच्या मदतीने झालेले पॅनेल हे आम्हाला मान्य नाही. शिंदे गटाशी कुठलीही सोयरीक आयुष्यामध्ये भविष्यात कुठल्याही राजकारणात शक्य होणार नाही. महाविकास आघाडीच्या विरोधातील पॅनेलला शिंदे गटाच्या उपस्थितीला आमचा प्रचंड विरोध आहे.