अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे.अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे. महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण करूनही महादेवराव महाडिकांची सरशी झाली आहे. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी अडीच हजार मतांनी उमेदवार आघाडीवर आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे 29 उमेदवार अवैध झाल्यानंतर टोकाची ईर्ष्या झाली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विरोधी आघाडीकडून घेरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, प्रत्यक्षात सभासदांनी महादेवरावर महाडिकांना कौल दिला आहे. उत्पादक गटातून अमल महाडिक आघाडीवर आहेत. अंतिम निकाल सर्व फेऱ्यांमधील मतमोजणी पार पडल्यानंतर घोषित करण्यात येणार आहे. मात्र, आता महाडिक गटाच्या विजयाची औपचारिकता राहिली आहे.
पहिला विजयी गुलाल अप्पा महाडिकांना! संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिकांची सरशी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -