मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी कमाल करत पंजाबला त्यांच्याच घरात हरवलं. पंजाबने मुंबईसमोर 215 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य खूप अवघड वाटलं होतं, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी झंझावाती खेळी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. शेवटी तिलक वर्माने सिक्सर मारत विजय साकार केला. ईशानने 41 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. तर सूर्यकुमारने 31 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. तिलकनेही 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पॉइंट टेबल मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा आज पराभव झाल्यामुळे 10 गुणांसह पॉईंट टेबल मध्ये सातव्या स्थानी आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या संघाचे 10 गुण झालेले आहेत.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान