Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगराष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या निवृत्तीवर ठाम असल्यामुळे आता नव्या अध्यक्षाची चर्चा सर्वत्र होत आहे . त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, राष्ट्रवादीची धुरा कुणाच्या खांद्यावर असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नावं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आली. मात्र या सर्व नावांमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. तसे पवारांनी नेत्यांसमोर वक्तव्य केल्याची माहिती आहे. दरम्यान, 6 मे रोजी होणारी बैठक 5 मे रोजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचं मुंबई प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. शरद पवार म्हणाले, “1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. असे ते म्हणाले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -