कोल्हापूर शहर आणि जिल्हात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने काही नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे तर काही नागरिकांना याचा त्रास हा सहन करावा लागला आहे.पावसाने शेतकरी सुखावला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे, तसेच उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नद्यांची पात्र कोरडी पडल्याने ऊसावर विपरित परिणाम झाला होता. या पावसाने ऊसासह अन्य पिकांना जीवनदान मिळाले आहे, तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणीवीजेचे खांबही मोडून पडल्याने विज गेली आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसानही झाले आहे.
कोल्हापूर आणि परिसरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. शहरात मंगळवारी सायंकाळी सहानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे करवीर तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या, तर काही ठिकाणी पूर्णत: झाडे मोडून वीजेच्या तारांवर पडल्याने अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहीमपूर, गवसे, पुंद्रा, कानूर, कोकरे, अडुरे परिसरातही पाऊस झाला. शिरोळ तालुक्यातही वळीव पावसाने हजेरी लावली.
या पावसाचा सर्वाधिक फटका हा आजरा या शहराला बसला. पावसाचा फटक्यानंतर आजरा शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आलेले पहायला मिळाले. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले पहायला मिळाले.
कोल्हापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, आजरा शहरात पूरस्थिती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -