देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत गेल्या 24 तासांत एक हजारांनी घट झाली असून 22 हजार 406 हजारांवरून ही संख्या 21 हजार 109 वर पोहोचली आहे. दरम्यान, आठ जणांचा मृत्यू झाला असून यात केरळमधील रुग्णांची संख्या जास्त आहे.देशात मार्च-एप्रिलपासून वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत एप्रिल महिन्यापासून घसरण सुरू झाली असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही विक्रमी घसरण सुरू आहे.
मृतांचा आकडाही 44 वरून आज आठवर आली आहे. 67 हजारांवर पोहोचलेला सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 21 हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 154 कोरोना रुग्ण सापडले, तर एकाचा मृत्यू झाला. 297 जण कोरोनामुक्त झाले, तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 1 हजार 423 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत दिवसभरात 47 रुग्ण सापडले, तर 67 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1 हजार 274 चाचण्या करण्यात आल्या, तर सक्रिय रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजारावर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -