KKR vs RR: संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ विजया मिळवण्यालाठी मैदानात उतरेल. राजस्थानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात आणि चेन्नई संघ पॉईंट टेबलवर आघाडीवर आहेत. कोलकात आणि राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल, तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे करो या मरो च्या स्थितीत असलेले दोन्ही संघ आज मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. विजय मिळवून प्लेऑफमध्ये कोण दाखल होणार? आणि कोणाचं आव्हान संपुष्टात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -