Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगमध्य महाराष्ट्रात प्रखर उष्णतेमुळे सामान्यांची लाहीलाही, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

मध्य महाराष्ट्रात प्रखर उष्णतेमुळे सामान्यांची लाहीलाही, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता नोकरीसाठी आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या सामान्यांना वाढच्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर आता राज्यातील आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच नागरिकांना भरदुपारी बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमान ४० अंशावर पोहचल्यामुळं सामान्यांची लाही-लाही होत आहे.

विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांचं तापमान ४० अंशावर पोहचलं आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्याही तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यानंतर आता अनेक जिल्ह्यांतील आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -