दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उत्तरपत्रिकेत 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्याचं समोर आलं आहे. पेपर तपासणाऱ्या शिक्षकाला आमिष दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे कृत्य केलं.पण लाच देण्याच्या या प्रयत्नाचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पुढील एक वर्षासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच या परीक्षेत विद्यार्थी नापास होणार आहेत. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (GSHSEB) वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘गुजराती माध्यमात शिकणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री नव्हती’.
गुजरातमध्ये 14 ते 29 मार्च दरम्यान 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा झाल्या. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनादरम्यान, शिक्षकांनी गणित आणि इंग्रजीच्या उत्तरपत्रिकांना नोट्स स्टॅपलिंग केल्याची माहिती दिली. बोर्डाने प्रोटोकॉल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांविरोधात तक्रार नोंदवली. बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘आम्ही या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. कारण ही फसवणुकीची केस नाही. बोर्डाची समिती प्रथम विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतर शिक्षेचा निर्णय घेईल’.Anokhi Shakkal
दोन्ही विद्यार्थ्यांच्या या कृत्याबद्दल बोर्डाच्या( Board) अधिकाऱ्यानं नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्या होत्या. यासोबतच विद्यार्थ्यांनी लिहिलं की, ‘कृपया मला पास करा, कारण मी परीक्षेची तयारी करू शकलो नाही.’ अधिकाऱ्यानं सांगितलं की, विद्यापीठाचे विद्यार्थी परीक्षेदरम्यान काही वेळा उत्तर पत्रिकेत नोटा चिकटवतात. परंतु शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे करणं अत्यंत निराशाजनक आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, 2022 मध्येही असेच प्रकरण समोर आलं होतं. मध्य गुजरातमधील बारावीच्या एका विद्यार्थ्यानं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांमध्ये 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्या. त्यानंतर त्याला नापास होण्यासह एक वर्षासाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली होती.Anokhi Shakkal