विराट कोहली ( Virat kohli) आणि गौतम गंभीर ( Gautm Ganbhir) यांच्यातील वाद जगजाहिर आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू अनेकदा आमनेसामने आलेत. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातही या दोघांमध्ये गरमागरमी अन् टशन पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात आरसीबी आणि लखनौ यांचा सामना बेंगलोरमध्ये झाला. अटीतटीच्या लढतीत लखनौने आरसीबीचा पराभव केला. विजयानंतर आवेश खान, गौतम गंभीर आणि संघातील इतर सहकाऱ्यांनी केले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आरसीबीने इकाना स्टेडिअमवर लखनौचा पराभव करत हिशोब चुकता केला होता.
एक मे रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने लखनौचा पराभव केला. पण हा सामना गाजला तो विराट कोहली आणि गौतम गंभीर, नवीन उल हक यांच्या वादामुळे…. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादामध्ये गौतम गंभीर यानेही उडी घेतली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाने पुन्हा चर्चेला वाव दिला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात प्रंचड बाचाबाची झाली. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना सामन्याच्या मानधनातील शंभर टक्के दंड ठोठावला. या वादानंतर लखनौ आणि आरसीबी पुन्हा आमनेसामने येणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या. क्वालिफायरमध्ये हे दोन आमनेसामने येणार असल्याचा अंदाज बांधू लागले.. आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होण्यासाठी काही समीकरणे आहेत.. IPL 2023, RCB Vs LSG
आरसीबी आणि लखनौ यांच्यात एलिमिनटरमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काय समीकरणे आहेत, पाहूयात..
आरसीबीला हैदराबाद आणि गुजरात यांच्याविरोधात सामना जिंकावाच लागेल.
चेन्नईने दिल्लीचा पराभव करावा
कोलकात्याने लखनौचा पराभव करावा
हैदराबादने मुंबईचा पराभव करावा
जर वरीलपैकी चारही गोष्टी झाल्या तर आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पुन्हा एकदा आरसीबी आणि लखनौ यांच्यातील थरार पाहायला मिळणार आहे. विराट-नवीन,गौतम गंभीर यांच्यामध्ये मैदानावर टशन पाहायला मिळाले होतेच. त्याचा दुसरा अंक सोशल मीडियावर पाहायला मिळाला. विराट कोहली मुंबईविरोधात बाद झाल्यानंतर नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्याआधी गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यात साहा आणि राशिद यांच्या खेळीचे कौतुक करताना विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वीट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत या खेळाडूंमध्ये ट्विटरवॉर सुरु होते. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. IPL 2023, RCB Vs LSG