Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाचेन्नईचा Play off मध्ये दिमाखात प्रवेश दिल्लीचा केला 77 धावांनी पराभव

चेन्नईचा Play off मध्ये दिमाखात प्रवेश दिल्लीचा केला 77 धावांनी पराभव

ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेची अर्धशतकी खेळी आणि दीपक चहरने पटकावलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर चेन्नई सुपर(CSK) किंग्जने दिल्ली(DC) कॅपिट्सचा ७७ धावांनी पराभव केला.हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर(Arun Jaitley Stedium) खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करतना चेन्नईने २२३ धावा केल्या आणि दिल्लीसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले हाेते. या विजयामुळे चेन्नईने दिमाखात ‘प्लेऑफ'(Play off)मध्ये प्रवेश केला आहे.

गुजरात पाठोपाठ प्लेऑफमध्ये( Play off) धडक मारणारा चेन्नई हा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने १४ सामने खेळले यातील ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे १ गुण देण्यात आला होता. दिल्लीला पराभुत केल्यानंतर चेन्नईच्या एकूण गुणांची संध्या १७ इतकी झाली आहे.

दिल्लीकडून, डेव्हिड वॉर्नर ५८ चेंडूमध्ये ८६ , यश धुलने १५ चेंडूमध्ये १३ धावा, अक्षर पटेल ८ चेंडूमध्ये १५ धावा, पृथ्वी शॉ ७ चेंडूमध्ये ५ धावा, अमन खानने ७ चेंडूमध्ये ५ धावांचे योगदान दिले. चेन्नई कडून दीपक चहरने ३, मथीशा पथीराणाने २ तर रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड ५० चेंडूमध्ये ७९ धावा, डेवॉन कॉनवे ५२ चेंडूमध्ये ८२ धावा तर शिवम दुबेने ९ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील अहमद, चेतन सकारिया आणि अनरिख नोर्खिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

IPL 2023 Playoffs : मुंबई, आरसीबीवर टांगती तलवार

गुजरातनंतर आता चेन्‍नईने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता उर्वरीत दाेन संघांसाठी लखनौ सुपर जायंट्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांमध्ये रस्सीखेच असणार आहे. १४ व्या सामन्यात लखनौने केकेआरचा पराभव केल्‍या तर हा संघ प्लेऑफमधील आपलं स्‍थान पक्‍के करेल. मात्र या संघाचा पराभव झाल्‍यास याचा फायदा मुंबई आणि आरसीबीला संघाला हाेणार आहे. मात्र लखनाै जिंकल्‍यास मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघाचे टेन्‍शन चांगलेच वाढणार आहे. आता मुंबईचा(Mumbai) पुढील सामना हैदराबाद विरुद्ध हाेणार आहे. तर आरसीबीला गुजरातशी सामना करावा लागणार आहे. या दाेन्‍ही संघाना आता विजयाबराेबरच धावांची गतीही ( रनरेट) चांगली ठेवावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -