Sunday, July 27, 2025
HomeमनोरंजनSambhaji Raje : "कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे"; संभाजी राजेंनी केलं गौतमी पाटीलचं...

Sambhaji Raje : “कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे”; संभाजी राजेंनी केलं गौतमी पाटीलचं समर्थन

कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे,  महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठिशी उभं राहायला हवं. तसेच गौतमी पाटीलला पाठिंबा द्यायला हवा, असं म्हणत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje ) यांनी गौतमी पाटीलचं (Gautami Patil) समर्थन केलं आहे. 

गौतमी पाटीलने तिचं पाटील आडनाव काढाव का? याबद्दल प्रतिक्रिया देत संभाजीराजे म्हणाले,”महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविलं आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झालं आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे”.


“पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Modi) यांनी संसद भवनाचे उद्घाटन केले. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असते तर याची गरिमा वाढली असती”, असा टोला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला लगावला आहे. संभीजीराजेंना या संसद भवन सोहळ्याच निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. याबद्दल बोलताना ते म्हणाले,”ही लोकशाही आहे, छत्रपतींचा वंशज म्हणून मला बोलवंल नाही. ही अपेक्षा मी करत नाही. विरोधकांनी का बहिष्कार टाकला या नंतरच्या बाबी आहे, पण पंतप्रधानांबरोबरच राष्ट्रपती असले तर या कार्यक्रमाची गरीमा आणखी वाढली असती, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात महापुरूषांनी जातीय विषमता नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे बाकी राज्यात जसं जातीवर राजकारण चालंत तसं महाराष्ट्रात होवू नये अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी सध्याच्या राजकारणवर बोलताना व्यक्त केली आहे. बाकीच्या राज्यात जातीवर राजकारण चालते, जाती विषमता जर कमी करायची असेल, बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे, सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक कंटाळले आहे, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

भाजप शिंदे गटातील जागा वाटपावरुन गोंधळ तसेच महाविकास आघाडीतील वाद याचा निश्चित स्वराज्य पक्षाला फायदा होईल असा विश्वास, संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. ईडीला मी घाबरत नाही, आयुष्यात चुकीचं काम केलंच नाही तर घाबरायचं कशाला.. ज्यांना घाबरायचं ते घाबरतील असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावला आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -