ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलियाने लंडनमध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली आहे. लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 234 धावांवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा जिंकणारी न्यूझीलंडनंतर दुसरी टीम ठरली.
टीम इंडियाची दुसरी इनिंग
टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मा याने 43 धावा केल्या. शुबमन गिल दुर्देवी ठरला. शुबमन 18 धावा करुन माघारी परतला. चेतेश्वर पुजारा बेजबाबदार शॉट मारुन 27 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने 49 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे याने 46 धावांची झुंजार खेळी केली. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर झिरोवर आऊट झाले. केएस भरत याने 23 धावा केल्या. मोहम्मद शमी 13 धावांवर नाबाद राहिला. मोहम्मद सिराज आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 धाव केली.
ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. स्कॉट बोलंड याने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क याने 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, टीम इंडिया फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा अपयशी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -