Sunday, July 27, 2025
HomeसांगलीSangli:आधी पार्टी केली, मग शेततळ्यात पोहायला गेले, त्यानंतर परतलेच नाही

Sangli:आधी पार्टी केली, मग शेततळ्यात पोहायला गेले, त्यानंतर परतलेच नाही

Sangli : पार्टीनंतर पोहोयला गेलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीत उघडकीस आली आहे. मिरज तालुक्यातील सोनीमध्ये ही घटना घडली. होमगार्ड चालकांच्या परिक्षेसाठी परीक्ष केंद्रावर ड्युटी होती. ड्युटी संपल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. तिम्बती आवळे असे मयत पोलिसाचे नाव आहे. आवळे हे सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.पार्टी केल्यानंतर शेततळ्यात पोहायला गेले होते
भोसे येथे मंगळवारी सांगली होमगार्ड चालकांची परिक्षा होती. या परिक्षेसाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परीक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु, पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -