ताजी बातमी ऑनलाईन टीम
भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरुन हा मुद्दा सुरु झालाय. शरद पवार यांनी 1977 मध्ये माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाला 40 आमदारांसह पाठिंबा काढला होता. त्याच घटनेचा दाखला देत फडणवीस यांनी टीका केली. त्यावर शरद पवार यांनी फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती नाही, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“शरद पवार म्हणाले ते खरं आहे. मी 1977 मध्ये प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी त्यांना ते अस्वस्थ करणारं होतं म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. “मी कुठेही शरद पवार यांनी बेईमानी केली, असं म्हटलं नाही. ते भाजपसोबत आले नाही, असंही मी म्हटलं नाही. उलट ते भाजपसोबत आले हे मीच सांगितलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचं पवारांना प्रत्युत्तर काय?
“मी काय म्हटलं होतं, शरद पवार यांनी 1978 मध्ये वसंत दादा पाटील यांच्यासोबत ते मंत्री होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातील 40 लोकं बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे हे तर आमच्यासोबत निवडून आले होते. ते तिथून 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केलं”, असं फडणवीस म्हणाले.
दावे, प्रतिदावे, डिवचणं आणि प्रत्युत्तर, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -