ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी येथील ॲक्टीफ कार्पोरेशन डेक्कन मिलमध्ये परचेस व स्टोअर रुममधून सुटे भाग व स्क्रॅपच्या चोरी प्रकरणी एकास शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश आबासो जाधव असे चोरट्याचे नांव असून त्याच्याकडून ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी मिलचे व्यवस्थापक नामदेव महादेव पाटील (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, स्टेशन रोडवरील ॲक्टीफ कार्पोरेशन लि. डेक्कन मिलच्या परचेस व स्टोअर रूममधून सतीश जाधव हा रींग फ्रेमचे स्पेअर्स व कॅपेसिटीचा बॉक्स चोरुन नेत असताना व्यवस्थापक नामदेव पाटील यांनी रंगेहात पकडले. त्याचबरोबर शहापूर पोलिसांनी या चोरीबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जाधव वाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत जाधव याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १५ हजार किंमतीचे रोग फ्रेमचे स्पेअर्सचा बॉक्स व २० हजार रुपये किंमतीचा २१ केव्हीआर कैपेसिटीचा बॉक्स असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहापूरचे प्रभारी अधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
इचलकरंजी ; स्क्रॅप चोरी प्रकरणी एकास अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -