रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही समुद्रकिनारी तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटातील गाणे म्हणताना दिसत होती. गाणे म्हणण्यासोबतच आलिया भट्ट ही डान्स करताना देखील दिसत होती. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे सोशल मीडियावर प्रमोशन करताना दिसत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा आलिया आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. रणवीर सिंह याच्या या चित्रपटाकडून आता सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सर्कस हा चित्रपट फ्लाॅप गेला होता. या चित्रपटाकडून रोहित शेट्टी याला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट धमाका करू शकला नाही.
एक काळ बाॅलिवूडमध्ये असा होता की, अभिनेत्री एकमेकांच्या दुश्मन असायच्या. मात्र, आता तो काळ गेला असून अनेकदा अभिनेत्री एकमेकींच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. नुकताच आलिया भट्ट हिच्यासाठी खास गिफ्ट हे दीपिका पादुकोण हिने पाठवले आहे. आलिया भट्ट हिने दीपिका पादुकोण हिने पाठवलेल्या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इतकेच नाही तर खास गिफ्ट पाठवल्याबद्दल दीपिका पादुकोण हिचे धन्यवाद मानताना देखील आलिया भट्ट दिसत आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, दीपिका पादुकोण हिने आलिया भट्ट हिच्यासाठी कॉस्मेटिक प्रोडक्ट पाठवला आहे. आलिया भट्ट हिने फोटो शेअर करत म्हटले की, ब्रीज पाठवल्याबद्दल धन्यवाद…विशेष म्हणजे हा फोटो स्वत: आलिया भट्ट हिने काढला आहे.
आता आलिया भट्ट हिने शेअर केलेली ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आलिया भट्ट हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटाती आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.