Friday, August 1, 2025
Homeराजकीय घडामोडीराजकीय महानाट्यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस!

राजकीय महानाट्यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस!

महाराष्ट्र राज्याच्या सत्तानाट्यामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास राजकीय महाभूकंप झाला. त्यामध्ये कधीही न होणारी अशी एकनाथ शिंदे (शिवसेना), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी पहायला मिळाली. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांना थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर व्हॉटस्अॅप, फेसबूक, इन्स्ट्राग्राम आदि सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊसच पडत होता.

सरकार कोणाचेही येऊ द्या अजित पवार ला कॉमन परमनंट उपमुख्यमंत्री केलं पाहिजे असा एक कायदा करून घ्या राव, म्हणजे एकदाची कटकट मिटून जाईल. अजित दादा कुठ पण घुसून उपमुख्यमंत्री होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकिर्दीला प्रभावीत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. या निर्णयाचे कौतुक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी अजित पवार यांची महत्वाची भूमिका ठरेल.

अनेकजण सरकारच्या अशा आघाडीवर उलटसुलट प्रतिक्रिया तर मिश्किल टीकाटिप्पणी करून राज्यातील आघाडीची खिल्ली उडविली. त्यावर सर्वत्रच उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, या
पार्श्वभुमीवर विविध पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यानंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचे ४० आमदार फुटून भाजप समवेत युती करून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. या घटनेनंतर राज्यस्तरावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्याचबरोबर सोशल मिडीयातूनही मिम्सचा पाऊस पडला.

त्यामध्ये ‘काय झाडी, काय डोंगार, एकदम ओके… ओके.. ही मिम्स फेमसच झाली. त्यानंतर ४० खोके एकदम ओके… याचा • सिलसिला सुरू झाला. शिवसेनेत घडलेल्या घडामोडीचे न्यायालयीन लढा सुरू झाला. हा महाराष्ट्रातील जनतेला एक मोठा धक्काच होता. या धक्क्यातून सावरत असतानाच रविवार ता. २ रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठा राजकीय भूकंप दिला. त्यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह दुसऱ्यांदा बंड केले. त्यानंतर थेट राजभवनात जाऊन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ वरीष्ठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

अचानक झालेल्या राजकीय महानाट्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश ढवळून निघाला. अनेक राजकीय मंडळींनी यावर प्रतिक्रीया, आरोप केले. त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर दोन • दिवसांपासून मिम्सचा अक्षरशः पाऊसच पडत आहे. घडलेल्या राजकीय महानाट्यामुळे सर्वसामान्य जनता आवाक बनली असून राजकारणावरील जनतेचा विश्वासच उडाला असल्याच्या तिव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.
राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राची राजकारणाची पातळी किती खालच्या पातळीवर गेली आहे हे दर्शवणारे आहे. लोकशाही व्यवस्थेत इडी व सीबीआय यांची भिती घालुन विरोधकांना संपवणेचे काम सुरु आहे. हे लोकशाहीला घातक आहे या सर्व बाबीचे केंद्रबिंदु पंतप्रधान नरेंद मोदी असून त्यांना विरोधकांची एकी मोडून काढून पुन्हा सत्तेत येण्याचा हव्यास आहे. राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सचिव- शशांक बावचकर

साहेबांनी भाकरी फिरवली दादा पिठाचा डबाच घेऊन गेले
सगळ्यांची होडी करून सोडून देतो
अजून एक उपमुख्यमंत्री करा म्हणजे तीन शिफ्ट मध्ये काम करतील – एक एमआयडीसी कार्यकर्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी जी काही वल्गना करत होती, शिंदे फडणवीस सरकार पडणार किंवा या सरकारमध्ये सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांच्या निर्णयाचे फलित होत नाही या फक्त वल्गना राहिल्या. महाविकास आघाडीची फूट हे या निमित्ताने दिसून आले. तसेच नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर अविश्वास या बंडातून दिसून आला. शिवसेना जिल्हा प्रमुख- रविंद्र माने

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -