टेरेसवरुन घरात प्रवेश करुन हॉलमध्ये ठेवलेले मोबाईल व बेडरुममधील संकमधील रोकड असा २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सांगली नाका
परिसरातील चिनार हौसिंग सोसायटी गल्ली नं. १ मध्ये घडली. या प्रकरणी जमील सत्तार मणेर (वय ३२) यांनी
शहापूर पोलिसात तक्रार दिली आहे.
जमील मणेर हे चिनार हीसिंग सोसायटीत भाडयाने राहण्यास
आहेत. गुरुवारी मध्यरात्री से शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या टेरेसवरील दरवाजा उघडून घरात
प्रवेश केला.
घरातील हॉलमध्ये ठेवलेले १८ हजार रुपये किंमतीचे ३ मोबाईल तसेच बेडरुममध्ये सॅकमध्ये ठेवलेली ५ हजाराची रोकड असा २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास पोहेकॉ कोरे करीत आहेत.