Sunday, August 3, 2025
Homeसांगलीसांगलीत महिला पोलिसावर बलात्कार

सांगलीत महिला पोलिसावर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर पोलिसानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिला पोलिसाने वसीम शब्बीर ऐनापुरे (वय 35) आणि त्याचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघे रा.संजनयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित महिला सांगली पोलिस दलात कार्यरत आहे. सांगली पोलिस बँड पथकातील वसीम ऐनापुरे याच्यासोबत पीडितेची ओळख होती. वसीम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली. त्यानंतर वसिमने पीडितेला दि. 4 मार्चपासून दि. 6 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध व जबरदस्तीने बलात्कार केला. यामध्ये पीडित पोलिस महिला गर्भवती देखील राहिली. पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर पीडिता तक्रार करू नये, यासाठी वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरून धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी पोलिस कर्मचारी वसीमला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -