Saturday, August 2, 2025
Homeराजकीय घडामोडीकाँग्रेसमध्ये 45 आमदारांचा गट, त्यातील 31 आमदार फुटून बाहेर जातील यांची.....; माजी...

काँग्रेसमध्ये 45 आमदारांचा गट, त्यातील 31 आमदार फुटून बाहेर जातील यांची…..; माजी मुख्यमंत्र्यांच मोठ विधान

सत्तेचा गैरवापर, दबाव, दहशत, ईडी, सीबीआय याचा वापर करून काही नेते दहशतीखाली भाजपकडे गेले असले, तरी लोक शरद पवार यांना सोडून जाणार नाहीत.याचा प्रत्यय काही दिवसांतच येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत राष्ट्रवादीचे नाव न घेता व्यक्त केला.

येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते. आमदार चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, ”विधानसभा अध्यक्षापुढे एकनाथ शिंदे गटाविरुद्ध पक्षांतर बंदीचा कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे कोणाला नोटीस पाठवायचे, कोणाला साक्षी करता बोलवायचे हे ठरवून विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यवाही करतील‌.दहा ऑगस्टच्या सुमारास निलंबनाच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांना निवाडा द्यावा लागेल. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करावे लागणार आहे. ते विधी तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य आहे, असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांना सुप्रिम कोर्टात जायचा मार्ग मोकळा आहे.

सध्या विरोधी पक्ष नेत्याबाबत चर्चा करण्याची गरज नाही. पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांना बाजूला जावे लागते. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये फुटीची शक्यता नाही. काँग्रेस पक्षामध्ये ४५ आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील ३०-३१ आमदार फुटून बाहेर जातील, याची अजिबात शक्यता नाही. भाजपच्या गोटातून खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे.यापूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हे बघूया. त्यांना साधे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नाही, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

भाजपला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाचे हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, हे मी गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे. कित्येक वेळेला अमित शहा म्हटले होते, की काँग्रेसमुक्त. काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहेहुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकूमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं, की नाही हे जनतेच्या हातात आहे, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -