Sunday, August 3, 2025
Homeसांगलीसांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

शहरासह कुपवाड परिसरात घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. राकेश शिवलिंग हदीमणी (वय २४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १४ हजार रुपयांच्या रोकडसह तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत आहे.

या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार धामणी रोडवरील शांतीबन चौक परिसरात छापा मारून हदीमणी यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये १४ हजार रुपयांची रोकड, चार तोळे ६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने तर १२५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत विश्रामबाग पोलिस ठाणे, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्यावेळी घरफोडी करून ऐवज लंपास केल्याचे सांगितले.

हदीमणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, कुमार पाटील, बिरोबा नरळे, सुनिल जाधव आदींसह पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -