राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली येणार्या सीपीआर हॉस्पिटलच्या जुन्या कॅथलॅबची मुदत ऑक्टोबर 2024 मध्ये संपणार असल्याने नव्या कॅथलॅब मिळण्यासाठीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. 16 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन मंडळाकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जुन्या कॅथलॅबची मुदत संपण्यापूर्वी नवीन कॅथलॅब मिळणार आहे.
कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय गोरगरिबांसाठी वरदान आहे. या रुग्णालयात केवळ कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकण, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येत असतात. 650 खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाकडे रुग्णांचा मोठा ओघ असतो. दर महिन्याला 150 हून अधिक तपासण्या कॅथलॅबमध्ये केल्या जातात. ही कॅथलॅब 2014 मध्ये सुरू केली होती. पहिली पाच वर्षे संबंधित कंपनीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी होती. त्यानंतर आणखीन पाच वर्षेही अन्य एका कंपनीसोबत करार केला होता. त्याची मुदत आता ऑक्टोबर 2014 मध्ये संपणार असल्याने नव्या कॅथलॅबची आवश्यकता होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता.
या कॅथलॅबसाठी सुमारे 16 कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. त्यामुळे एवढ्या निधीची तरतूद करावी लागणार असल्याने हे काम प्रलंबित होते. परंतु, नुकतेच वैद्यकीय शिक्षण विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे निधीची तरतूद जिल्हा नियोजन मंडळात केली जाणार आहे. त्यामुळे आता नवी कॅथलॅब तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
पाच ते सहा महिन्यांत ही लॅब तयार होणार आहे. जुनीची मुदत संपण्यापूर्वीच नवी कॅथलॅब तयार होईल. त्यामुळे रुग्णांची चांगली व्यवस्था होणार आहे. सीपीआरला सुपर स्पेशालिटी अंतर्गत 3 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इतर सुविधाही त्या तुलनेत असणे गरजेचे आहे, महत्त्वाचे म्हणजे कॅथलॅबचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
सीपीआरला मिळणार नवी कॅथलॅब
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -