Saturday, August 2, 2025
Homeइचलकरंजीशहापूर येथे घडला खळबळजनक प्रकार

शहापूर येथे घडला खळबळजनक प्रकार

शहापूर येथे रिअल इस्टेट व्यावसायिकास कोयत्याचा धाक दाखवत अपहरण करून व पेट्रोलने जाळून मारण्याची धमकी देऊन 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपये रोख असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्याचा खळबळजनक प्रकार घडला. इचलकरंजीतील कुख्यात व रेकॉर्डवरील जर्मनी गँगच्या नऊ जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; तर उर्वरित संशयितांच्या शोधासाठी चार पथके रवाना केली असल्याचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितले. ही घटना शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास शहापूर म्हसोबा मंदिर मार्गावरील ओढ्याजवळ घडली. अपहरणानंतर पाच तास विविध ठिकाणी फिरवून मारहाण करीत अपहरण झालेल्या व्यावसायिकास सांगली-कोल्हापूर मार्गावर पहाटे तीनच्या सुमारास सोडण्यात आले. याबाबतची फिर्याद सरदार अमिन मुजावर (वय 48, रा. गैबान रेसिडेन्सी, म्हसोबा मंदिरमागे, शहापूर) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.

सरदार मुजावर हे भिशी चालवण्यासह रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. त्याचे कार्यालय इचलकरंजीतील भोने माळ येथे आहे. शनिवारी रात्री मोटारीने ते शहापूर येथे घरी जात होते. शहापूर ते म्हसोबा मंदिर मार्गावरील ओढ्याजवळ त्यांची मोटार आली असता दुचाकी व मोटारीतून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या काही युवकांनी दुचाकी आडव्या मारून मुजावर यांना थांबायला भाग पाडले. संशयितांनी रूप्या, आंद्या, मेहबुब, सिद्ध्या व इतर 5 अनोळखींनी दुचाकी व मोटार (एमएच 45 ए 2330)मधून कोयत्याचा धाक दाखवून खाली उतरविले.

दहशत माजवण्यासाठी मुजावर यांच्या मोटारीची काच फोडून कोयत्याचा धाक दाखवून रुमालने डोळे बांधून आपल्या मोटारीत बसवले. दरम्यान तेथून जाणार्‍या सरदार यांच्या ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार संशयास्पद वाटला. त्याने संशयितांच्या वाहनांचा दुचाकीवरून पाठलाग केला. म्हसोबा मंदिर, यड्राव फाटा, पार्वती औद्योगिक वसाहतमार्गे अपहरणकर्ते सांगलीच्या दिशेने मुजावर यांना घेऊन निघाले. आपला दुचाकीवरून पाठलाग करत असल्याचे यावेळी अपहरणकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोटार थांबवून त्या व्यक्तीलाही कोयत्याचा धाक दाखवून धमकाविले. यामुळे ती व्यक्ती तेथून माघारी फिरली आणि त्यांनी घडला प्रकार आपल्या सहकार्‍यांना मोबाईल वरून सांगितला.

यादरम्यान संशयित अपहरणकर्त्यांंनी मुजावर यांची सोन्याची चेन, दोन तोळ्याचे ब—ेसलेट, 3 सोन्याच्या अंगठ्या व हातातील रॅडो कंपनीचे घड्याळ काढून घेतले. जिवंत सोडायचे सेटलमेंट म्हणून त्यांच्याजवळ असलेली 4 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच मुजावर यांना पेट्रोलने जाळून टाकण्याची धमकी देऊन त्यांना कोयत्याचा धाक दाखवून महापुरुषांबद्दल अपशब्द बोलायला लावले. मोबाईलमध्ये त्याचे रेकॉर्डिंग करून जर्मनी गँगच्या खर्चासाठी दर महिन्याला 20 हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असेही धमकावले. अन्यथा, हे रेकॉर्डिंग व्हायरल करून कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. पाच तास चाललेल्या या थरारक फिल्मी स्टाईल घटनेनंतर अखेर अपहरण केलेल्या मुजावर यांना तमदलगेजवळील एका हॉटेलसमोर सोडून देण्यात आले.

पोलिसांना चकवा

अपहरणाचा प्रकार समज्यावर पहाटेपर्यंत सरदार मुजावर यांच्या संबंधित अनेक युवक व पोलिस संशयितांच्या शोधासाठी रात्रभर फिरत होते. मोबाईल लोकेशनवरून ठावठिकाणा सापडू नये यासाठी संशयितांनी मुजावर यांचा मोबाईल काढून घेऊन आपल्याच टोळीतील एकाकडे दिला होता यामुळे मोबाईलचे लोकेशन एका बाजूला व संशयित एका दुसरीकडे अशी स्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -