ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. तब्बल 22 वर्षांनंतर तारा सिंग आणि सकिनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी असली तरी त्याच्या ट्रेलर आणि टीझरने तिथे बरीच चर्चा घडवून आणली आहे. चित्रपटात सनी देओलचे पाकिस्तानवर बरेच डायलॉग्स आहेत. याच डायलॉग्सवर आता तिथल्या नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. ‘अगर यहाँ के लोगों को दोबारा मौका मिले ना हिंदुस्तान मे बसने का, तो आधा से ज्यादा पाकिस्तान खाली हो जायेगा’ या डायलॉगवर पाकिस्तानी नागरिकांवरून आक्षेप घेतला जात आहे.
पाकिस्तानमधील बऱ्याच युट्यूबर्स आणि न्यूज पोर्टल्सनी यावर तिथल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्यात एकाने म्हटलंय, ‘एक पाकिस्तानी हा हजार भारतीय सैन्यावर भारी पडू शकतो.’ तर दुसऱ्याने थेट सनी देओलला आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर सनी देओलने पाकिस्तानात येऊन माझ्याशी थेट लढाई करावी’, असा इशाराच त्याने दिला आहे.
‘गदर 2’ने अवघ्या तीन दिवसांत 134.88 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी 40.10 कोटी रुपये, शनिवारी 43.08 कोटी रुपये आणि रविवारी 51.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘गदर 2’सोबत तर अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. जर या दोन्ही चित्रपटांची टक्कर झाली नसती तर ‘गदर 2’च्या कमाईत आणखी 30 कोटींची भर पडली असती असा अंदाच चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.
Gadar 2 मधील सनी देओलच्या ‘त्या’ डायलॉगवर पाकिस्तानी नागरिक भडकले; दिलं थेट आव्हान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -