Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगतांदूळ, गहू, डाळी आणि भाज्या स्वस्त होणार!

तांदूळ, गहू, डाळी आणि भाज्या स्वस्त होणार!

मान्सूनच्या आगमनाने देशात खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. तांदूळ, गहू, डाळी, हिरव्या भाज्यांचे भाव भडकले आहेत. 20 ते 30 रुपये किलोने उपलब्ध असलेला टोमॅटो जुलैमध्ये 250 रुपये किलोच्या पुढे गेला आहे.

त्याचप्रमाणे हिरव्या भाज्याही अनेक पटींनी महागल्या आहेत. यामुळेच जुलैमध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांवर पोहोचली, जी जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी 4.81 टक्के नोंदवली गेली होती. विशेष म्हणजे गव्हाबरोबरच तांदूळही महाग झाला आहे. मात्र, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे.

पावसाळ्याचे आगमन होताच प्रथम टोमॅटोच्या भावात 363.8 टक्क्यांनी वाढ झाली. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटो 350 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र, टोमॅटोचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेच टोमॅटोची विक्री सुरू केली. यापूर्वी सरकारने टोमॅटोची 90 रुपये किलोने विक्री सुरू केली होती. Rice, wheat rate यानंतर 80 रुपये किलो आणि नंतर 70 रुपये किलो दराने विक्री सुरू झाली. आता केंद्र सरकार 40 रुपये किलोने टोमॅटो विकत आहे. मात्र, सरकारच्या या पावलामुळे टोमॅटोचे दर खाली आले आहेत. आता किरकोळ बाजारात टोमॅटो 60 ते 80 रुपये किलो झाला आहे.

वाढत्या किमतींना ब्रेक लागेलअशाप्रकारे गव्हाच्या दरात 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम पिठाच्या किमतीवर झाला असून, त्यामुळे खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. पण, गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकार रशियाकडून गहू खरेदी करण्याचा विचार करत आहे. सरकार रशियातून 80 ते 90 लाख टन गहू निर्यात करू शकते, असे सांगितले जात आहे. यामुळे गव्हाच्या वाढत्या किमतीला ब्रेक लागेल, अशी सरकारला आशा आहे. Rice, wheat rate तसेच महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतरही भाव अद्याप खाली आलेले नाहीत. तसेच आता टोमॅटोपाठोपाठ कांदाही महागला आहे. अनेक शहरांत तो 35 ते 40 रुपये किलोने विकला जात आहे. तर काही दिवसांपूर्वी त्याचा दर केवळ 20 रुपये किलो होता.

सप्टेंबरपासून कांद्याला 70 ते 80 रुपये किलो दर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावेळी सरकार आधीच सतर्क झाले आहे. त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के आयात शुल्क लावले आहे. यासोबतच बफर स्टॉकमधून 3 लाख टन कांदा सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ती स्वत: देशातील अनेक शहरांमध्ये २५ रुपये किलो दराने कांदा विकत आहे. तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याशिवाय साखरेच्या निर्यातीवरही बंदी आहे. त्याचबरोबर डाळी आणि तेलबियांच्या आयातीला केंद्राने परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत पुढील महिन्यापासून खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची सरकारला आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -