पाकिस्तान विरुद्ध सामना रद्द झाला. आता नेपाळ विरुद्धच्या मॅचवर नजर आहे. आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा सामना नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही टीममधील हा पहिला सामना आहे. अनुभवाच्या बाबतीत भारतासमोर नेपाळची टीम कुठेही टिकत नाही. म्हणजे टीम इंडियासाठी आव्हान जास्त कठीण नाहीय. पण टीम इंडिया विजय मिळवण्यात कुठलीही कसूर ठेवणार नाही. टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं. टीम इंडिया नेपाळ विरुद्ध कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह खेळणार हा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तान विरुद्ध जी टीम होती, तीच प्लेइंग इलेव्हन कायम असेल का? किंवा काही बदल होतील का?नेपाळ विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तान विरुद्ध सर्व खेळाडूंना संधी मिळाली नाही. दुसऱ्याबाजूला टीम कॉम्बिनेशन बनलय, तर त्याला सेटल व्हायला सुद्धा थोडावेळ लागेल. अधिक सामने झाल्यानंतरच टीम कॉम्बिनेशन बनेल. नेपाळ विरुद्ध टीम इंडिया जुनी चाल खेळण्याची शक्यता आहे. जुनी चाल म्हणजे पाकिस्तान विरुद्ध जी रणनिती होती, तीच नेपाळ विरुद्ध असेल. आज नेपाळ विरुद्ध टीम इंडियात फक्त एक बदल होऊ शकतो. जसप्रीत बुमराह व्यक्तीगत कारणामुळे मुंबईला परतलाय.
जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? ते एकदा जाणून घ्या.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट का?
भारत आणि नेपाळमध्ये सामना पल्लेकेलेमध्ये होणार आहे. म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये सामना इथेच झाला होता. त्यावेळी पावसामुळे सामना रद्द झाला होता. नेपाळ विरुद्ध सामन्यातही तीच स्थिती आहे. पावसाची शक्यता आहे. वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियाच्या दृष्टीने ही महत्त्वाची स्पर्धा आहे.