Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअभ्यास केलेलं परीक्षेत आलंच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिपकवल्या 500 च्या...

अभ्यास केलेलं परीक्षेत आलंच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिपकवल्या 500 च्या नोटा

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये कॉपी करताना सापडलेल्या 1720 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर एका विद्यार्थ्याने त्याच्या सात उत्तर पत्रिकांवर प्रत्येकी पाचशेच्या नोटा चिपकवल्या होत्या, त्याच्यावर चार परीक्षा न देण्याची बंदी घालण्यात आली आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत चार विद्याशाखांमधील चक्क 85.66 टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार, चार विद्याशाखांमध्ये एकूण 1720 विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्ल्यूपीसी-होल परफॉर्मन्स कॅन्सल) अशी कडक शिक्षा करण्यात आली.

अभ्यास केलेलं परीक्षेत आलं नाही, म्हणून 500 च्या नोटा चिपकवल्या

एका विद्यार्थ्याने त्याच्या सातही उत्तरपत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिपकवल्या होत्या. या गैरवर्तणुकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 अन्वये विद्यापीठाच्या गठित 48 (5) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यावर चार परीक्षा बंदीची कारवाई करण्यात आली. अभ्यास केलेला पण त्यामधील काहीच आलं नाही असं त्या विद्यार्थ्याने समितीपुढे सांगितलं. समितीने या गैरवर्तणुकप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयांची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी-2023 परीक्षांमध्ये एकूण 2008 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात कॉपी करणाऱ्या मानव्य विद्याशाखेतील 488 विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील 278, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 339 आणि आंतरविद्याशाखेतील 615 असे एकूण 1720 विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करण्यात आली. म्हणजेच या वर्षी अथवा या सेमिस्टरमध्ये देण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा निकाल हा शून्य करण्यात येतो. यामधील दोन विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव (आरटीडी-रिझल्ट टू बी डिक्लेअर्ड) ठेवण्यात आला. गैरवर्तणूक केलेल्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना सर्व संपादणूक रद्द आणि अधिक चार परीक्षांसाठी बंदी, अशीही कडक शिक्षा केलेली आहे.

दरम्यान, नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर ही बाब परीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठवल्या. लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ही बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. याबाबत दोघांचीही उन्हाळी-2023 परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

आकडेवारी

एकूण विद्यार्थी- 2008
कॉपीबहाद्दर- 1720
मानव्य शाखा- 488
वाणिज्य- 278
विज्ञान शाखा- 339
आंतरविद्याशाखा- 615

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -