आशिया कपच्या (Asia Cup 2023) सुपर-4 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं (Team India) पाकिस्तानवर (Pakistan) 228 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय चाहते खूप आनंदी होते.देशभरात टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन झालं, पण पाकिस्तानचा संघ मात्र हा पराभव पचवू शकला नाही. टीम इंडियाविरोधात खेळण्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. टीम इंडियानं अवघ्या 128 धावांवर पाकिस्तानला रोखलं आणि विजय मिळवला. पण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा पराभव सहन करू शकला नाही. पाकिस्तानच्या या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांवर काही प्रमाणात नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
बाबर आझम चाहत्यांवर नाराज
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चाहत्यांवर नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सामना संपल्यानंतर बाबर आझम मैदानाबाहेर जात आहे, त्याच दरम्यान एका चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बाबर आझम तिथून निघून गेला. चाहत्यानं पुन्हा एकदा बाबरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी बाबर आझम रागानं काहीतरी बोलताना दिसतोय. बाबर चिडल्यानंतर चाहता शांतपणे माघारी फिरला. पाकिस्तानच्या कर्णधाराचा संतापाच्या भरातील व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा संतप्त व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. बाबर संतापाच्या भरात चाहत्याला हातवारे करत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर बाबर आझमचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची फलंदाजी ढासळली
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार आणि वनडे क्रिकेटमधील नंबर 1 चा फलंदाज बाबर आझम टीम इंडियाच्या विरोधातील सामन्यात फारशी चांगली खेळी करू शकलेला नाही. त्यानं 24 चेंडूंमध्ये 2 चौकारांच्या मदतीनं केवळ 10 धावा केल्या. बाबर आझमला भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं माघारी धाडलं.
पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय
वन डे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या विरोधात सर्वात मोठा विजय मिळवला. आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं 50 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावत 356 धावा केल्या. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि विराट कोहली दोघांनीही शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं आपल्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियासाठी धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघानं 32 ओव्हर्समध्ये केवळ 128 धावा रचल्या अन् टीम इंडियानं 228 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला.
क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या आशिया चषकात टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. जर समिकरणं जुळून आली, तर क्रिकेट चाहत्यांना आशिया चषकाच्या फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना पुन्हा एकदा अनुभवायला मिळू शकतो. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये हा सामना होऊ शकतो. दरम्यान, यंदाच्या आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाला आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करेल. असं झाल्यास सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. दोन्ही सामन्यांचा निकाल सारखाच लागला, तर अंतिम फेरीत टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.
पाकिस्तानला पराभवच पचेना, चिडलेल्या बाबर आझमची चाहत्यावर चिडचिड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -