संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर सत्ताधारी पक्ष भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ मुद्रित केले जात असल्याच्या वृत्तावरून काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोर यांचा समावेश करण्याऐवजी ‘कमळ’च का मुद्रित केले जात आहे, असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद मणिकम टागोर यांनी केला. यानंतर आता याच मुद्द्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मोदी सरकारला संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचं फूल लावू द्या. मात्र, जनता २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही. लोक यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत .”